आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL: वर्ल्डकपसाठी संघ उभारण्याची प्रक्रिया सुरू, अव्वल युवा खेळाडूंमध्ये रंगणार चुरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१९च्या विश्वचषकासाठीचा संघ उभारणे ही आगामी कालखंडाची प्रमुख गरज असेल. त्या दृष्टीने यापुढील आयपीएलपासून स्थानिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येकाची कामगिरी मोजली जाईल. विश्वचषकासाठीच्या संघातील सर्वोत्तम १५ खेळाडूंसाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडू तणावाखालील परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, दडपण कसे हाताळतो आणि कामगिरी करतो, हाच यापुढील निवडीचा निकष असेल. सध्या खेळत असलेले १५ आणि त्यांच्या जागा घेऊ शकणारे, भारतीय संघाच्या प्रवेशासाठी धडपडणारे १० ते १५ अशा खेळाडूंमध्येच ही चुरस असेल, असे कॅरेबियन बेटांच्या क्रिकेट दौऱ्याच्या सुरुवातीलाच आज विराट कोहलीने स्पष्ट केले. २०१९च्या संघाचा हाच चेहरा असेल. प्रत्येकाला दोन वर्षांत गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी असेल.
 
आत्ताच्या संघातील खेळाडूंमध्ये उत्तम संघभावना आहे. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास आहे. एकमेकांवर निष्ठा आहे. आगामी दोन वर्षांच्या कालावधीतही तेच कायम राहील, याचा मला विश्वास आहे. सतत खेळत राहिल्यामुळे येणारा कंटाळा दूर करणे, हे मोठे आव्हान असते. तरीही तेच करत राहावे लागते. प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी कळते. त्यातही एखादा चुकत असेल तर त्याला मार्गदर्शन करावे लागते. परंतु सतत तेच तेच करून न कंटाळता सराव करूनच यशस्वी होता येते. हा संघ तेच करीत आहे.
 
‘बोअरिंग’ क्रिकेटपासून दूर जाण्याचा  कायम प्रयत्न असेल. प्रत्येक पराभवानेच नव्हे तर विजयामुळेही आम्ही त्या वेळी झालेल्या चुकांपासून शिकलो; शिकत आहोत. कप्तानपदाच्या जबाबदारीमुळे अनेक चांगले बदल होतात. संघातील विविध खेळाडूंशी कसे वागायचे, कसे व्यक्त व्हायचे, ते नेतृत्व शिकवितो, असे ताे म्हणाला. 
 
आकर्षक आणि आक्रमक क्रिकेट खेळायचे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आकर्षक आणि आक्रमक क्रिकेट खेळायचे, हा आमचा कायम दृष्टिकोन असेल. आम्ही कोणत्याही क्रिकेट स्पर्धेला, मालिकेला कमी लेखत नाही. प्रत्येकाचा शंभर टक्के नव्हे तर १२० टक्क्यांपर्यंत योगदान देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येकाला त्याच्या कार्याची, जबाबदारीची व्याख्या ठाऊक असते. अपेक्षा ठाऊक असतात. मात्र आम्ही आकर्षक, आक्रमक क्रिकेट खेळण्याची नवी संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तीच या संघाची शक्ती आहे.
 
बातम्या आणखी आहेत...