आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Ranragini Bhumata Brigade's Attempt To Enter The Prohibited Inner Sanctum Of The Shani Shingnapur Temple

मंदिर प्रवेशाबाबत निर्देशाला आव्हान लिंगभेदाच्या अाधारे नियम नसल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यांवर महिलांना प्रवेश देण्यात यावा, हा न्यायालयाचा निर्णय कायद्याचा चुकीचा अर्थ लावून घेण्यात अाला अाहे. हे निर्देश मागे घ्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्याने हायकाेर्टात दाखल केली आहे. याबाबत जलद सुनावणीस न्यायालयाने नकार दिला.

न्यायमूर्ती डी. एच. वाघेला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनीता पाल यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यांवर महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि निर्मला वर्तक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले. "जर पुरुषांना प्रवेश मिळत असेल, तर महिलांना का नाही', असे सांगत न्यायालयाने सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी, असे म्हटले होते. याचिकाकर्त्याचे वकील सुभाष झा म्हणाले, ‘न्यायालयाने ज्या कलमाच्या आधारे महिलांना प्रवेशाचा निर्णय दिला तो दलित आणि अनुसूचित जातींसाठी आहे. त्यामुळे लिंगभेदाचा आधार घेऊन महिलांना प्रवेश देणे या कलमात बसत नाही’, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काेल्हापुरात देसाईंना "रणरागिणी’ रोखणार