आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीनंतर होणाऱ्या न. प निवडणुकीकडे राज्याचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारची पहिली अग्निपरीक्षा म्हणून बघितले जात असलेल्या नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची ताकद वाढणार की घटणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जसजसा काळ उलटत आहे तसतशी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. अशातच देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर राज्यातील निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकांना होत असलेला प्रचंड त्रास, शेतकऱ्यांची फरपट यामुळे काळा पैसा संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, या आवाहनाला साद देतील का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
राज्यात युती सरकार सत्तेत येण्यापूर्वी १९५ नगर परिषद व पंचायतींच्या ४ हजार २५५ जागांसाठी २००९ ते २०१३ या कालावधीत निवडणूक पार पडली. या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आला. राष्ट्रवादीने १ हजार १५६ जागा तर काँग्रेसने त्याखालोखाल १ हजार ८९ जागा जिंकल्या. भाजपने तिसरा क्रमांक पटकावत ३९८ तर शिवसेनेने ३६२ जागा जिंकल्या होत्या. ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या निवडणुकांमध्ये राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचे थेट प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटले.

त्यामुळे २०१५ मध्ये झालेल्या ८० नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास आला. ८० नगर परिषदा व पंचायतींच्या एकूण १ हजार ४५८ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ३९३ जागा जिंकल्या.

काँग्रेसने ३०५ जागा जिंकून दुसरा तर राष्ट्रवादीने२७७ जागा जिंकून तिसरा क्रमांक पटकावला. शिवसेना २१३ जागांसह चौथ्या क्रमांकावर आली. यानंतर एप्रिल महिन्यात औरंगाबाद व नवी मुंबई , जूनमध्ये वसई-विरार तर नोव्हेंबरमध्ये कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर अशा पाच महानगरपालिकांची निवडणूक घेण्यात आली. एकूण ५४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना १२७ जागांसह पहिल्या क्रमांकावर तर ८४ जागा जिंकत भाजपने दुसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रवादीने ७२ जागा जिंकून तिसरा तर ५१ जागांनी काँग्रेसला चौथ्या समाधान मानावे लागले.
भाजपची पीछेहाट
२०१६ हे वर्ष या सत्ताधाऱ्यांच्या उतरंडीचे संकेत देणारे ठरत आहेत. जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत राज्यातील २५ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्यात अाल्या. एकूण ४३३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला जबर हादरा बसला आणि तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेसने ४३३ पैकी १२५ जागा जिंकत पहिले स्थान तर राष्ट्रवादीने ९८ जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले. शिवसेनेने ७७ जागा जिंकल्या तर भाजप केवळ ३८ जागा जिंकू शकला.
बातम्या आणखी आहेत...