आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करण्यास विराेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणाचे प्रकरण राज्य मागासवर्ग आयोगाकडे देण्यास आक्षेप घेणारी नवीन याचिका गुरूवारी उच्च न्यायालयासमोर सादर झाली आहे. आयोगाची वैधताच तपासण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र ही याचिका सध्या मुख्य याचिकेत समाविष्ट करण्यास नकार देत न्यायालयाने स्वतंत्रपणे जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
पुण्याच्या रहिवाशी मृणाल ढोले यांनी ही याचिका सादर केली अाहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागासवर्ग आयोगापुढे मांडण्यापूर्वी आयोग आणि त्यावरील नियुक्त्यांची वैधता तपासण्याची त्यांची मागणी अाहे. काही वर्षे हा आयोग अस्तित्वातच नव्हता. तसेच या आयोगावर नियुक्त्या करण्यापुर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या आयोगाचे अध्यक्ष असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे यांच्या निवडीवरही त्यांचा आक्षेप आहे.  दरम्यान, राज्य सरकारने हा मुद्दा आयोगाकडे पाठवण्यास हरकत नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे. मात्र काही याचिकाकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितल्याने यावर कोणतीही चर्चा न होता सुनावणी ३ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...