आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प दाेन वर्षांत पूर्ण हाेणार; नाशिक, अाैरंगाबाद जिल्ह्यात सिंचनाला फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी ९१७.७४ कोटींच्या तृतीय सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यामुळे २ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पापासून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ७४ हजार २१० हेक्टर जमिनीला सिंचन क्षेत्राचा लाभ होईल. १९६६ मध्ये १४.२९ कोटी रुपये खर्चाच्या मूळ प्रशासकीय मान्यतेच्या प्रकल्पाला १९९९ मध्ये १८९.९८ कोटींची प्रथम सुधारित मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर २००८ मध्ये ४३९.१२ काेटींची दुसरी सुधारित मान्यता प्राप्त झाली. दरसूचीतील बदल, भूसंपादन किमतीत वाढ, सविस्तर संकल्पनेनुसार वाढीव तरतुदींमुळे प्रकल्पाची किंमत वाढली. त्यामुळे तृतीय सुधारित मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पांतर्गत सर्व मुख्य धरणांचा पाणीसाठा पूर्ण झाला आहे. जून २०१६ अखेर एकूण ७१ हजार ५५१ हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती झाली असून २ हजार ३७६ सिंचन क्षमता निर्माण होणे शिल्लक आहे. 
बातम्या आणखी आहेत...