आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वांत वजनदार महिलेवर मुंबईत शस्त्रक्रिया, तिचे वजन 100 किलोंनी घटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील सर्वांत वजनदार महिला असलेल्या यमन अहमदवर मंगळवारी मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मागील २५ वर्षांपासून एकाच जागी अंथरुणाला खिळून पडलेल्या इजिप्तच्या ५०० किलो वजनाच्या यमनला गेल्या महिन्यात मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिचे वजन १०० किलोंनी घटले आहे.
 
मंगळवारी तिच्यावर लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गेस्ट्रेक्टोमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर ३६ वर्षीय यमनला तोंडावाटे द्रवपदार्थ देणे सुरू असून ती लवकरात लवकर सामान्य लोकांप्रमाणेच व्हावी, यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...