आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर - कारच्या डिकीतून गायींची चोरी, प्रयत्‍न फसला, आरोपी फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर - गोहत्येच्‍या मुद्दयावरून देशात सध्‍या चर्चेला उधाण आले आहे. दररोज नवनवीन विषय समोर येत आहेत. अशातच पालघर जिल्‍ह्यातील पारोळा येथे तीन दिवसांपूर्वी कारच्‍या डिकीतून गाय चोरण्याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. ग्रामस्‍थांच्‍या जागरूकतेमुळे हा प्रयत्‍न फसला नि चोरट्यांनी कार सोडून पळ काढला.
पारोळ येथे मंगळवारी रात्री खानिवडे गावातील मोकाट गुरे चोरण्याचा प्रयत्न फसला. या घटनेत चोरटे फरार झाले. मात्र, त्‍यांची कार पोलिसांनी ताब्‍यात घेतली व चोरट्यांवर गुन्‍ह्याची नोंद केली. या प्रकरणी सदरील मांडवी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री काही तरुण दवाखान्यात जात होते. वाटेत काही गायी आणी अनोळखी व्यक्तींच्‍या संशयास्‍पद हालचाली दिसल्‍या. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न असता एका कारमध्ये गायींना कोंबत असल्याचे त्या मुलांनी पाहिले, तर दुसर्‍या एका गायीला डिकीत कोंबले होते. तेव्हा ती गुरे चोरणारी टोळी असल्‍याचे मुलांच्‍या लक्षात आले. मुलांनी तत्‍काळ गावात संपर्क साधून नागरिकांना घटनास्‍थळावर बोलावून घेतले.
दुचाकीने केला पाठलाग
गावातून मोठ्यासंखेने नागरिक अापल्‍या दिशेने येत असल्‍याचे पाहून चोरट्यांनी कार नागरिकांच्या अंगावर घालत महामार्गावरून गुजरातच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागरिकांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग सुरू केला. या घटनेत चोरटे फरार झाले. या चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून मांडवी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.