आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुंड्यासाठी छळ प्रकरणातील अाराेपींमध्ये राधे माँचा समावेश नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वयंघोषित धर्मगुरू राधेमाँ यांनी हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात राधेमाँ आरोपी नसल्याचे ते म्हणाले. कांदिवली पोलिसांनी स्थानिक न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सुखिंदर कौर ऊर्फ राधेमाँ यांचे नाव नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. असे असले तरी महिलेच्या पतीसह सासरच्या सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या या प्रकरणात दहा दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले. राधेमाँ यांचे भक्त असलेल्या सासू-सासऱ्यांना राधेमाँ यांनी चिथावणी दिल्याचा आरोप ३२ वर्षीय महिलेने केला. मुंबई उच्च न्यायालयाने राधेमाँ यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...