आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Is No Need To Change Cm In Maharashtra Sushilkumar Shinde

पृथ्वीराज सक्षम, पराभवाच्या विश्लेषणासाठी समिती नेमा -सुशीलकुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सक्षमपणे नेतृत्त्व करीत आहेत. पक्षाचा पराभव झाला म्हणून नेतृत्त्वात बदल करून चालत नाही. याऊलट झालेल्या चुका शोधून पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. पक्षाचा पराभव का झाला याचे विश्लेषण केले पाहिजे व त्यासाठी एखादी सत्यशोधन समिती नेमली पाहिजे असे मत मावळते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यात काँग्रेसचा दारूण झालेल्या पराभवाबाबत चिंतन बैठकीत आढावा घेण्यात येत आहे. यात जिल्हा व विभागवर माहिती घेतली जात आहे. सोलापूरमधून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा दीड लाखाने पराभव झाला होता. याबाबत सोलापूर जिल्हा व उर्वरित पदाधिका-यांची बैठक झाली. याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वरील मत मांडले.