आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुशिवाय पूर्ण होत नव्हती RK Studio ची पार्टी; असा आहे ग्रेट शोमॅनच्या या स्टुडिओचा इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजयंतीमाला यांच्यासोबत राज कपूर (पहिले छायाचित्र),  सितारा देवी यांच्यासोबत नृत्य करताना राज कपूर (दुसरे छायाचित्र), संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या सोबत रणधीर आणि ऋषी कपूर (तिसरे छायाचित्र). - Divya Marathi
वैजयंतीमाला यांच्यासोबत राज कपूर (पहिले छायाचित्र), सितारा देवी यांच्यासोबत नृत्य करताना राज कपूर (दुसरे छायाचित्र), संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या सोबत रणधीर आणि ऋषी कपूर (तिसरे छायाचित्र).
मुंबई- चेंबूर येथील आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 1948 मध्ये बनवलेला या स्टुडिओत अनेक चित्रपटांची शुटिंग झाली आहे. विशेषत: आर. के. स्टूडिओनेच्या सर्व चित्रपटांची शुटिंग येथेच होत होती. तेथे होणाऱ्या पाटर्यांची आठवण आजही लोक काढतात. या पाटर्यांमध्ये दारु पिणे कम्पल्सरी होते. या होणाऱ्या होळीत सामील होण्यासाठी सिनेजगतातील प्रत्येक व्यक्तीची उत्सुकता होती. आज आम्ही आपल्याला आर. के. स्टुडिओतील काही खास किस्से आणि येथे होणाऱ्या पाटर्यांविषयी माहिती देणार आहोत.
 
कधीही न विसरता येणारी होळी
आर. के. स्टुडिओत साजरी होणारी होळी अतिशय प्रसिध्द होती. राज कपूर यांनी 60 च्या दशकात या स्टुडिओत होळी आणि गणेशोत्सव सुरु केला. येथे गणोशोत्सव आजही साजरा केला जातो. पण राज कपूर यांचे निधन झाल्यावर होळी उत्सव साजरा करण्याचे बंद करण्यात आले. या उत्सवात बॉलीवूडमधील लहान-मोठे सगळेच सामील होत. अमिताभ बच्चनपासून शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान, राजेंद्र कुमार, नर्गीस, सितारा देवी, शंकर-जयकिशन या सारखे दिग्गज कलाकार या उत्सवात सामील होत होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...