मुंबई - कपड्यांवरून कोणाचे व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य ठरवू नका. तसेच कपड्यांवरून कोणावर निर्बंधही लादू नका, विशेषत: महिलांवर. हा संदेश देण्यासाठी दहा तरुण युवक चक्क महिलांचे कपडे घालून मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती. चार एप्रिलच्या रात्री त्यांनी मायानगरीतील पृथ्वी थिएटर ते जुहू बीचदरम्यान मुलींसोबत ‘नॉइट वॉक’ही केला.
अनोख्या वेशभूषेतील युवकांना पाहून मुंबईकर चकित झाले होते. ‘तुम्ही असे का फिरत आहात?,’ अशी विचारणा काहींनी या युवकांना केली. तेव्हा त्यांचे उत्तर होते,‘माय चॉइस.’ हा अनाखा उपक्रम राबविणार्या युवकांच्या ग्रुपचे नाव आहे ‘व्हाय लॉयटर.’ त्यांच्या या मोहिमेचा उद्देश आहे मुक्त जीवन. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने
आपल्या मर्जीनुसार जीवन जगावे, जे मनात येईल ते परिधान करावे. इतरांच्या कपड्यांवर अथवा त्यांच्या इच्छांवर बंदी घालण्याचा कुठलाही हक्क आम्हाला नाही. एखाद्या मुलाने जर गुलाबी रंगाचा ड्रेस घातला तर तो ‘गे’ असेलच असे नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जर मुले कधीही, कुठल्याही कपड्यांत फिरू शकतात, तर मग मुलींवरच निर्बंध कशासाठी? हाच संदेश या मुलांना द्यायचा होता.
तुर्कीकडून प्रेरणा
तुर्कस्तानमध्येही महिलांवर होणारे अत्याचार आणि शोषण ही सर्वांत मोठी समस्या आहे. फेब्रुवारीत बलात्काराला विरोध केल्याने तेथे एका मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर तेथील काही परिवर्तनवादी पुरुषांनी स्कर्ट घालून महिलांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने केली होती.