आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाण्यात डुबली होती मुंबई तरीही कंबरेपर्यंतच्या पाण्यातून पोहचवले अन्न!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई खालसा ऐड (मदत) आणि श्री गुरुसिंह सभा मुंबई यांच्या स्वयंसेवकांनी गरजूंना अन्नदान केले. - Divya Marathi
मुंबई खालसा ऐड (मदत) आणि श्री गुरुसिंह सभा मुंबई यांच्या स्वयंसेवकांनी गरजूंना अन्नदान केले.
मुंबई- गेल्या शुक्रवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. एकाच दिवशी सुमारे 500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसाने मुंबई ठप्प झाली होती. ब-याच कालावधीनंतर मुंबई थांबल्यासारखी वाटत होती. रस्त्यापासून लोहमार्गावर सगळीकडे पाणीच पाणी होते. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने काही स्थानिक लोक एकाच जागेवर काही तास जागच्या जागीच उपाशी राहिले होते. पावसाच्या पाण्याने एका जागेवर दुस-या जागी जाणे कठीन असताना मुंबईतील काही युवक मदतीसाठी पुढे आले व पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न पोहचवले.
मुंबई खालसा ऐड (मदत) आणि श्री गुरुसिंह सभा मुंबई यांच्या संयुक्त मदतीने दादर रेल्वे स्टेशन परिसरात अनेक युवकांनी कमरेपर्यंतच्या पाण्यात जाऊन फक्त अन्नच दिले नाही तर त्यांच्याजवळील सामानही ने-आण करण्यास मदत केली. स्थानिक लोकांनी या उपक्रमाचे कौतूक केले.
खालसा ऐड संस्थेचे स्वयंसेवक संकटाच्या वेळी नेहमीच लोकांच्या मदतीसाठी धाऊन जातात हा अनुभव आहे. काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये आलेला भूकंप व त्याआधी काश्मिरात आलेला महापूर या दरम्यान संस्थेच्या स्वयंसेवकांनी तेथे जाऊन नागिरकांची मदत केली होती.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, या युवकांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना कशी केली मदत...
बातम्या आणखी आहेत...