आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्टर्न ड्रेस घातलेल्या महिलांना नव्हे येथे समस्त महिलांनाच आहे बंदी, ही आहेत कारणे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मॅक्सी टाईपचा ड्रेस ( वेस्टर्न गाऊन) घालून मंदिरात कशासाठी आलात? असा प्रश्न एका महिलेने विचारल्याने संतप्त होत एका लेडी पोलिस ऑफिसरने संबंधित महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. व्हिडिओ समोर येताच संबंधित महिलेने पोलिस अधिकारी प्रतिक्षा लाकडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस अधिकारी प्रतिक्षा लकडे यांनी एका महिलेला मारहाण केली हे कृत्य अयोग्य असले तरी तिने कशा प्रकारचे कपडे, ड्रेस घालून मंदिरात जावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न होता. मात्र, ज्या कारणामुळे तेथे घटना घडली त्या कल्याण (पूर्व) भागातील तिसगाव भागातील तिसाई मंदिरात वेस्टर्न ड्रेस आणि गाऊन घालून मंदिरात जाण्यास मनाई असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तसे काही झाल्यास देवीचा कोप होतो व अघटित काहीतरी घडते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच हा वाद झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पण हा व असा नियम महिलांनाच का असाही प्रश्न पुढे येतोच. आजही आपल्या देशातील विविध धार्मिक स्थळी मंदिरात, दर्गा आदी ठिकाणी जाण्यास महिलांना बंदी आहे. याविरोधात वेळोवेळी महिला आवाज उठवत असतात. दोन वर्षापूर्वी शनि शिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथा-यावर चढून एका महिलेने दर्शन घेतल्याने गदारोळ झाला होता. हे प्रकरण एवढे गाजले की पुढे तेथील व्यवस्थापनाला या चौथा-यावर महिलांना दर्शन घेण्यास परवानगी द्यावी लागली.

आज या निमित्ताने आपण स्लाईडद्वारे पाहूया, आणखी कुठे कुठे महिलांना मंदिरात जाण्यास आहे बंदी....

बातम्या आणखी आहेत...