आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • They Use Second Wife Only To Bring Water In Home

येथे पाणी भरण्यासाठी करतात दुसरी बायको, विधवांबरोबर करतात विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात सगळीकडे भीषण दुष्काळाबातच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे एकिकडे शेतकरी बेजार झालेला असताना ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना प्यायला पाणी आणण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने या सर्व समस्यांना आपण सामोरे जातो. पण आजही आपल्या देशातील अशी अनेक गावे आहेत, ज्याठिकाणी 12 महिने दररोज पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशाच एका गावाची कथा आपण आज ऐकणार आहोत, पण यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे. या गावात खास पाणी भरण्यासाठी बायको करून आणली जाते.

पाणी भरण्यासाठी स्वतंत्र पत्नी आणि संतती किंवा मुलांना जन्म देण्यासाठी वेगळी पत्नी.. हे वाचल्यानंतर काहीसे वेगळे वाटते नाही. पण ही एखाद्या कथेतील किंवा कादंबरीतील ओळ नाही, तर आपल्याच महाराष्ट्रातील एका गावाची कथा मांडणारे ते सत्य आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या डेंगनमल गावाबाबतचे हे कटू सत्य आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ डेंगनमल गावातील या विवाहपद्धतीविषयी...