आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Dasara Rally Is Last One, Shiv Sena Order For Crowd

शिवाजी पार्कवर यंदा शेवटचा दसरा मेळावा,गर्दी जमवण्याचे फर्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील शेवटचा असणार आहे. यंदाच शिवसेनेला परवानगी मिळणार नव्हती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयात राज्य सरकारने शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली नसल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली. गेल्यावर्षीही महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेला सशर्त परवानगी दिली होती. तोच आधार कायम ठेवत यंदाही न्यायालयाने शिवसेनेला आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देश देत शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची अखेरची संधी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांचे ओजस्वी विचार ऐकण्यास राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत असत. परंतु यंदा ते नसल्याने शिवसैनिक येण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिवसैनिक घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील वर्षी कदाचित परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नव्या जागेचा आधार घ्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. युवा सेना अध्यक्ष आदित्य प्रथमच दसरा मेळाव्यात मार्गदर्शनकरणार आहेत. मनसेला सोडचिठ्ठी दिलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.