आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सच्या पहिल्या दिवशी सुट्टी देते ही कंपनी; व्हिडिओतून शेअर केले महिलांचे दु:ख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मासिक धर्म अर्थात एमसी पीरियड्‍सदरम्यान नोकरदार महिला-तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या चार दिवसांत महिलांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबईतील एका कंपनीने अनोखे पाऊल उचलले आहे.

मुंबईतील डिजिटल मीडिया कंपनी 'कल्चरल मशीन'ने आपल्या महिला कर्मचार्‍यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर कंपनीने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. पीरियड्सदरम्यान महिलांना होणार्‍या त्रासाबाबत माहिती दिली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये...
- 'ब्लश' नामक यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पीरियड्सदरम्यान महिलांचे अनुभव दाखवण्यात आले आहेत. यासाठी कंपनीने एक सर्व्हे केला होता.
- यात एक महिला पीरियड्सच्या पहिल्या दिवसाचा अनुभव शेअर करते. "मला घरी जायचे आहे"
- दुसरी एक महिला सांगते, ऑफिसमध्ये पुरुष सहकारी असतात. या काळात त्यांच्यासोबत काम करणे खूप अवघड होऊन बसते.
- व्हिडिओच्या शेवटी कल्चरल मशीन कंपनीने आपल्या महिला कर्मचार्‍यांना पीरियड्सच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची घोषणाही केली आहे.

महिला म्हणाल्या... हे तर क्रांतिकारी पाऊल...
- कंपनीच्या प्रेसिडेंट ऑफ एचआर देवलीना एस.मजूमदार यांनी सांगितले की, "मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्याचा एक भाग आहे.
- महिला कर्मचार्‍यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी कंपनीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
- पीरियड्सच्या त्या चार दिवसांमधील महिलांची समस्या दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- आतापर्यंत यूट्यूबवर सुमारे दीड लाखाहून जास्त तर फेसबुकवर 2 लाख व्ह्यूज मिळाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा...संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...