आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is The New Year Gift For Modi From Pak Terroist Shivsena

पाकिस्तान दौ-यानंतर दहशतवाद्यांनी मोदींना दिलेली ही तर नववर्षाची भेट- शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजे पाकिस्तान दौ-यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेली सलामी आहे अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती तेच घडल आहे. केंद्रातील आपले सरकार एका बाजूला पाकिस्तानसोबत संवाद साधून दोन देशादरम्यान शांतता प्रस्थापित करू पाहत आहे तर, दुसरीकडे पाकिस्तानमधून भारतावर दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
पंजाबातील पठाणकोट येथील लष्कराच्या एअरबेसवर केलेला हल्ला म्हणजे नरेंद्र मोदींनी नुकत्याच केलेल्या पाकिस्तान दौ-यानंतरची दहशतवाद्यांकडून नववर्षाची देण्यात आलेली भेट आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
25 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट दिली होती. मोदींनी काबूलवरून थेट लाहौरला जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींच्या या भेटीनंतर त्यांच्या निर्णयाचे जगभर कौतूक झाले होते. तसेच मोदींनी एक मुसद्देगिरीचा नमुना सादर केल्याचे बोलले जात होते. दरम्यान, मोदी यांची लाहोरची भेट पाकिस्तानातील काही कट्टरपंथीय लोकांना पसंतीस पडली नव्हती. हाफिज सईदसारख्यांनी याबाबत गरळ ओखली होती. तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरू नयेत अशी पाकिस्तानातील काही कट्टरपंथीय घटकांना वाटत आहे. आजचा पठाणकोट हल्ल्या त्यासाठीच घडवून आणल्याची शक्यता आहे.
भारताने या हल्ल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेजारील देशांशी आम्हाला चांगले संबंध हवे आहेत मात्र आम्ही दहशतवाद कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावले आहे. दरम्यान, या घटनेमुळे जानेवारीत सुरु होणा-या भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेला खोडा बसण्याची शक्यता आहे. आजच्या घटनेबाबत नवाझ शरीफ सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारताने या घटनेचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील लोकांचे पाकिस्तानमध्ये बोलतानाचे संभाषण ट्रेस करण्यास भारताला यश आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.