आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यप्रेमींंसाठी खुशखबर: या बारमध्ये 2 रुपयांत मिळतेय Beer आणि 49 रुपयांत WHISKY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मोदी सरकारने देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी 500-1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. सरकारने 2000 रुपयांची नवी नोट चलनात आणली आहे. परिणामी बाजारात छोट्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यादरम्यान मात्र, मद्यप्रेमीसाठी खूशखबर आहे.

जास्तीत जास्त ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबईतील एका बियर बारने अनोखी शक्कल लढवली आहे. तीन म्हणजे बार मालकाने दोन रुपयांत दीडपाव बि‍यर आणि 49 रुपयांत व्हिस्‍की देण्याची ऑफर दिली आहे.
काय आहेत ऑफरच्या नियम व अटी...
- जुहू आणि लोअर परेल भागात असलेला पब 'मिस्‍टर बोजी'मध्ये ही आकर्षक ऑफर देण्यात आली आहे.
- ग्राहकांना या ऑफरचा लाभ 4 ते 8 डिसेंबर या काळात घेता येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की या ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे.
- मुंबईतील लोअर परेल आणि जुहू भागात या ऑफरचे जोरदार प्रमोशनही करण्यात येत आहे.
- विशेष म्हणजे पबने आपल्या 'फेसबुक' पेजवर या ऑफर विषयी माहिती दिली आहे. पबची अनोख्या ऑफरची सोशल मीडिया आणि व्हॉट्‍सअॅपवर चर्चा सुरु झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'मिस्‍टर बोजी' पबचे काही PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...