आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लोकलमध्ये भीक मागत केले एक कोटीपेक्षा अधिक रुपये जमा, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तुम्ही जर रोज लोकलने प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर चांगल्या पोशाखात एखादी व्यक्ती भीक मागताना दिसली तर तुम्ही त्या व्यक्तीला याचे कारण जरुर विचारा. तो कदाचित असे एखाद्याला मदत करण्यासाठी करत असेल. मुंबईत अशीच एक व्यक्ती आहे. प्राध्यापक असणारी ही व्यक्ती रोज लोकलमध्ये असे करते. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. ते हे पैसे स्वत:साठी वापरत नाहीत तर 700 गरीब मुलांसाठी वापरत आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत. त्यांनी अशा रितीने राज्यासह राजस्थान आणि बिहारमधील गरीब मुलांसाठी शाळा बनवल्या आहेत. 

 

असा घेतला गरीब मुलांना शिकवण्याचा निर्णय
- मरीन इंजिनिअर असलेल्या प्रा. संदीप देसाई यांची आई शिक्षिका होती. त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. देशातील नामांकित व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकविण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. 
- ते मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत होते. हे अहवाल वाचल्यावर त्याच्या लक्षात आले की देशातील लाखो मुले आजही शिक्षणापासून दुर आहेत. 
- त्यानंतर त्यांनी शिक्षण बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. मुलांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी 'श्लोका मिशनरीज' नावाची एक संस्था स्थापन केली. 

 

दर महिन्याला जमा करतात 5 लाख रुपये
- प्रा. देसाई हे 2010 पासून लोकलमध्ये पैसे मागत आहेत. त्यांनी आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. त्यांनी सांगितले की ते दरमहा साधारणता 5 लाख रुपये जमा करतात. ते प्रवाशांना आपल्या संस्थेबाबत सांगतात आणि विद्यादान देण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांच्या शाळांमध्ये सध्या 750 विद्यार्थी शिकत आहेत.
- मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोफत ड्रेस, पुस्तके आणि दुपारचे जेवण देण्यात येते. त्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येते.

 

सलमान खान यानेही केली मदत
- प्रा. संदीप देसाई यांच्या कार्याबद्दल माहिती झाल्यानंतर सलमान खानने त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना आर्थिक मदत केली. 

- सलमानने देसाईंना आश्वासन दिले की जोपर्यंत तो अभिनय क्षेत्रात आहे तोपर्यंत तो त्यांची मदत करेल. 

 

पोलिसांनीही केली अनेकदा अटक
- देसाई यांनी आपल्या कामाला नागपूर येथून सुरुवात केली. पण पैसे कमी पडु लागल्याने व कोणीही मदत करण्यास तयार नसल्याने त्यांनी सरळ रेल्वेत जाऊन लोकांकडे मदत मागितली.
- देसाई घरोघरी जाऊनही मदत मागत होते पण त्यांना कोणीही मदत करत नव्हते. रेल्वेत मात्र त्यांना लोक मदत करत असल्याचे लक्षात आले. लोकांनी मला भिकारी म्हणून तिरस्काराने पाहिले व अनेकदा माझी चेष्टाही केल्याचे त्यांनी सांगितले. भीक मागितल्याने त्यांना अनेकदा पोलिसांनी अटकही केली. आता मात्र मला लोक भीक मागून शाळा चालवत असल्याने चांगले ओळखत असून मदत करत आहेत.

 

धर्मातरणाचाही लावला होता आरोप
- 2012 पासून शाळा चालविणाऱ्या देसाई यांच्यासमोर अनेक संकटे आली. ते धर्मातरण घडवत असल्याचा आरोपही झाला. पण हे असत्य असल्याचे नंतर लोकांच्याच लक्षात आले.
- ते मुलांच्या किडण्या काढून विकत असल्याचाही आरोप करण्यात आला.
- सुरूवातीला त्यांच्याकडे 127 मुले शिक्षण घेत होती. पण अपप्रचारामुळे त्यांच्याकडे फक्त 39 मुले राहिली. त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचे सांगितल्यानंतर हळुहळु मुलांची संख्या वाढली. त्यांच्या शाळेत अनेकदा चोरीही झाली आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...