आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा 12 हजार पोलिसांची भरती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक लाख 20 हजार पोलिसांची गरज असून सरकारी तिजोरीतील खडखडाट पाहता किमान त्यातील निम्मे म्हणजेच 60 हजार पोलिसांची भरती पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे. त्यातील 12 हजार जागा या वर्षी भरल्या जातील. यासाठी दरवर्षी 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. सध्या राज्यात दर 550 लोकसंख्येमागे एक पोलिस असे प्रमाण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमाणानुसार दर 300 लोकसंख्येमागे एक पोलिस असायला हवा.