आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाचा अर्थसंकल्प नियोजनशून्य : तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आघाडी शासनाचा कारभार किती नियोजनशून्य आहे, याचा ढळढळीत पुरावाच अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून पुढे आला असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मंगळवारी केली.अर्थसंकल्पावरील तीनदिवसीय चर्चेची सुरुवात तावडे यांच्या भाषणाने झाली.

2013-14 च्या राज्य अर्थसंकल्पात कोणत्याही एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेले नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारमधे असलेल्या नेतृत्वाच्या अभावाचा पुरावा आहे. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्‍ट्राच्या विकासाच्या अधोगतीची नांदी असल्याचे तावडे या वेळी म्हणाले.

राज्याच्या नागरिकरणात वाढ होत आहे, त्याबरोबरच नागरी गरिबांचे प्रमाणही वाढत आहे. त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद नाही. दुष्काळ, कोरडवाहू शेती, वस्तुनिर्माण क्षेत्राचा घटता वाटा या मोठ्या समस्या आहेत. मात्र यातील एकाही समस्येवर अर्थसंकल्पात उपाययोजना केली नसल्याचे तावडे म्हणाले सांगितले.

नाशिक येथे भरणा-या कुंभमेळ्यासाठी वेगळी तरतूद हवी होती, असा मुद्दा हेमंत टकले यांनी मांडला. आदिवासींसाठी केलेली तरतूद अपुरी असल्याची टीका भाजपच्या शोभा फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पात एकही कल्याणकारी योजना नाही. उलट पूर्वीच्या योजनांनाही कात्री लावण्याचे काम या अर्थसंकल्पाने केल्याची टीका शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत यांनी केली.

कृषी व पर्यटनाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे सुभाष चव्हाण म्हणाले. शेकापचे जयंत पाटील यांनी हा अर्थसंकल्प केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून यामध्ये केलेल्या निधींची तरतूद तोंड बघून केली असल्याचा आरोप केला.