आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Republic Day Celebrates At Marine Drive

प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा मरीन ड्राइव्हवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी दिल्लीत राजपथावर होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याप्रमाणेच राज्यातील प्रजासत्ताक सोहळाही आता खुल्या रस्त्यावर आयोजित केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विविध विभागांच्या चित्ररथांबरोबरच वायुसेनेची हवाई प्रात्यक्षिकेही या वेळी जनतेला पाहाता येणार आहेत. अगोदर हा सोहळा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यात येत असे.
मंत्रिमंडळ बैठकीत प्रजासत्ताक दिनाच्या स्थानाबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती देताच काही मंत्र्यांनी वेळ कमी असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेळ भरपूर आहे असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाबाबत सांगितले की, नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या धर्तीवर राज्यात असा सोहळा आयोजित करण्याचा विचार सुरू होता. शिवाजी पार्कऐवजी मरीन ड्राइव्ह येथे सोहळा आयोजित केला तर तो खूपच प्रदर्शनीय आणि दिमाखदार होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक सोहोळ्यात हवाई दलाच्या वतीने आणखी जादा संचलन पथके, बँड पथके, हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी होणार असून उत्कृष्ट चित्ररथांना 50 लाख, 25 लाख आणि 15 लाख अशी क्रमश: प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.