आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Republic Day Ceremony On Shivaji Park, Government Decision

यंदाचा प्रजासत्ताक सोहळा शिवाजी पार्कवरच, सरकारचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीच्या राजपथावर साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच मरिन ड्राइव्हवर प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्याचे आघाडी सरकारच्या काळात ठरवण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षी मरिन ड्राइव्हवर भव्य प्रमाणात प्रजासत्ताक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता; परंतु यंदा पूर्वीप्रमाणेच प्रजासत्ताक दिन सोहळा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरच आयोजित करण्यात आला आहे. तसेच यापुढेही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा शिवाजी पार्कवरच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राजशिष्टाचार विभागातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले, मरिन ड्राइव्हवर रस्त्याचे काम सुरू असल्याने आणि हे काम ऑगस्टपर्यंत चालणार असल्यानेच शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात केंद्राच्या ५२ तुकड्या आणि विविध विभागाचे आठ चित्ररथ संचलन करणार आहेत. या कार्यक्रमात तीन हजार जवान सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असून १४०० पाहुण्यांना निमंत्रित केले असून तीन हजार नागरिकांना पासेस देण्यात आले असून राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमीत मलिक समन्वयाची भूमिका बजावत आहेत.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याची वैशिष्ट्ये
*नौदल, भूदल आणि सीआयएसएफच्या २७ पथकांचे संचलन
*पोलिस, होमगार्ड, नागरी संरक्षण दलाच्या २४ पथकांचे संचलन
*वाहतूक पोलिसांच्या २७ तुकड्यांचे मोटरसायकलवर फिरते संचलन
*पोलिसांच्या दहा विविध प्रकारच्या वाहनांचे संचलन
*अग्निशमन दलाच्या दोन अत्याधुनिक गाड्यांचे संचलन
*सोहळ्यात समाविष्ट होणारे चित्ररथ
*उद्योग- "मेक इन महाराष्ट्र' विषयावरील चित्ररथ
*नगरविकास- प्रगतीचा वेग नवा
*रोजगार हमी योजना- जलयुक्त शिवार अभियान
*वन विभाग- संजय गांधी उद्यान चित्ररथ
*ऊर्जा- वीज विकासाची जननी
*महसूल- गतिशील शासन आणि पारदर्शी प्रशासन
*आणि गृहनिर्माण- सामाजिक बांधिलकीची जाणीव- परवडणारी घरे