आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत अशी योगासने करते ही 20 वर्षाची शिक्षिका, तिचे हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगेश्वरी कलर्स वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेली आहे. - Divya Marathi
योगेश्वरी कलर्स वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेली आहे.
मुंबई/नाशिक- योग आणि नृत्याचा अनोखा संगम साधणाऱ्या एका शिक्षिकेचा आज आम्ही तुम्हाला परिचय करुन देणार आहोत. हवेतही योगासने करणारी ही शिक्षिका वयाच्या पाचव्या वर्षापासून हे करत आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच तिची दखल जगाला घ्यावी लागली आहे.

योगासनासाठी मिळालीत अनेक बक्षिसे
- धुळ्यात राहणाऱ्या या शिक्षिकेचे नाव योगश्वरी मिस्त्री असे आहे. ती कलर्स वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेली आहे.
- ती पॅरिस येथे आयोजित विश्व योग चॅम्पियनशीप 2013, मलेशियात आयोजित आशियाई योग चॅम्पियनशीप 2013 स्पर्धेचीही विजेती आहे.
- योगासने आणि नृत्याबरोबरच तिने जॅम्नॅस्टिकचे व्यावसायिक शिक्षणही घेतले आहे. सध्या ती मुंबईतील वडाळ्यात राहून प्रॅक्टिस करत आहे. 
 
वयाच्या 5 व्या वर्षापासून देत आहे योगासनाचे ट्रेनिंग
- योगश्वरी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून योगासने शिकत होती. वयाच्या 5 व्या वर्षापासून ती इतरांना ट्रेनिंग देऊ लागली.
- योगेश्वरीचे वडील साहेबराव पाटील हे नाशिकमध्ये पोलिस आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिला अनेक वेळा या बाबीचाही सामना करावा लागला. परंतु योगेश्वरीने हार न मानता योगासनांबरोबर नृत्य शिकुन एक नवा नृत्यप्रकार रुजवला आहे. तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- योगेश्वरीला मोठा भाऊ देखील आहे. तो तिच्या आई-वडिलांसोबत धुळ्यात राहतो. तो अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत आहे.
- योगेश्वरीला जे यश मिळाले त्यामागे तिच्या आई-वडिलांचा पाठिंबा हे देखील एक कारण होते. घरातील एक खोली योगेश्वरीच्या नावावर आहे.
योगासनांसाठी सोडले शिक्षण
- धुळे येथील एका शाळेत 10 पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर योगेश्वरीने डान्स आणि योगाचे शिक्षण घेतले.
- योगेश्वरीला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...