आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकारविरोधात बोलशील तर ठार मारू- आमदार बच्चू कडूंना धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जनतेच्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेणारे व वादग्रस्त आंदोलन करून चर्चेत राहणारे आमदार बच्चू कडू यांना ठार मारण्याची धमकी अज्ञातांनी फोनवरून दिली आहे. भाजप सरकार विरोधात बोलायचे नाही. जर तसे केले तर तूला ठारू मारू अशा प्रकारची ही धमकीच देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू रविवारी रात्री मुंबईहून अमरावतीला रेल्वेने निघाले असताना त्यांना मोबाईलवर ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी अमरावतीतील परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
 
आमदार बच्चू कडू यांना ज्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली तो मोबाईल फोन तेव्हापासून बंद करण्यात आला आहे. तुम खुद को नेता समझते हो क्या? सरकार के खिलाफ जादा मचमच मत करो, नही तो मारा जाओगे, ज्यादा कुछ करोगे तो ठोक देंगे, अशा भाषेत बच्चू कडू यांना धमकावण्यात आले आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांनी तक्रार नोंदवली असून भादंवि 506 आणि 507 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...