आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Accused In Gang Rape Of Minor Girl Arrested

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणारे तिघे विश्‍वासघातकी गजाआड, तिघांचा शोध सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील दिंडोशीत झालेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अद्यापही फरार असून त्‍यांचा शोध सुरु आहे. वासिम वट्टा (23), युवराज उर्फ सूर्या पिल्लई (19) आणि शिवकुमार कलवा (19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही प्रौढ असून त्‍यांना ठाणे जिल्‍ह्यातील दिवा येथून अटक करण्‍यात आली. उर्वरित तिघे जण दिवामध्येच लपले असल्याची माहिती असून हा परिसर पोलिसांकडून पिंजून काढण्‍यात येत आहे.

बलात्‍कार प्रकरणात वासिम वट्टा आणि सूर्या पिल्लई या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. दिंडोशीत शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल कऱण्यासाठी टाळाटाळ केली. अखेर सामाजिक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी गुन्‍हा दाखल करुन कारवाई केली. असगर, अर्जुन आणि राहुल अशी इतर तिघांची नावे आहेत.

मित्रांनीच केला घात... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..