आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांच्या तीनही मागण्या मान्य; अर्थमंत्री मुनगंटीवारांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘जीएसटी’ विधेयक मंजूर करण्यात शिवसेना आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने फडणवीस सरकार कचाट्यात सापडले होते. मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य केल्याने अाता सरकारसमाेरील अडचणी दूर झाल्या अाहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर हे विधेयक विधिमंडळात मंजूर हाेण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे.  

जीएसटी लागू करताना मुंबई पालिकेचे उत्पन्न कमी होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अाग्रही हाेते. त्यासाठीच जीएसटीला विरोध करण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी  तीन सूचना केल्या होत्या. जकातीचे उत्पन्न बंद झाल्यानंतर पालिकेला निधीची चणचण भासू नये ही ठाकरे यांची मुख्य मागणी होती. त्यानुसार मसुद्यात बदल करून रात्री उशिरा सुधारित मसुदा ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला. अर्थमंत्री मंगळवारीही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार होते; परंतु कार्यव्यग्रतेमुळे ते “मातोश्री’वर जाऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले, उद्धव ठाकरे यांनी जीएसटीला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना ठाकरे यांचा निरोप दिला. 

ठाकरे यांच्या ३ मागण्या   
- मुंबई मनपाची स्वायत्तता कायम हवी   
- मुंबई मनपाला केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल, तर सरकार भरपाई देईल. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये दरवर्षी ८% वाढ.   
- दर महिन्याला एस्क्रो अकाउंटमध्ये राज्य सरकारने पैसे जमा करावेत
बातम्या आणखी आहेत...