आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींचा चालक, निर्मात्याची समोरासमोर तीन तास चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत त्यांचा चालक राम प्रमोद मिश्रा व चित्रपट निर्माते खालिद किडवई यांची तीन तास पोलिसांनी चौकशी केली. ६६ वर्षीय ओम पुरीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंबईच्या सदनिकेत विवस्त्र अवस्थेत आढळला होता. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला दीड इंच खोल व ४ सेंमी लांब जखम असल्याचे समोर आले होते. त्यांच्या शरीरात अल्कोहल आणि पेनकिलरसारख्या औषधाचे अंश सापडले.

ओम पुरी रात्री १.०० वाजता घरी परतले होते. मात्र, मृत्यू १.३० ते २.२० दरम्यान झाल्याचे मानले जात आहे.  मृत्यूआधी ते निर्माते खालिद किडवई व चालकासोबत होते. सूत्रांनुसार, पोलिस ओम पुरी यांची पत्नी नंदिता, मुलगा ईशान व अभिनेता मनोज पाहवा यांची चौकशी करू शकते. खालिद यांच्या दाव्यानुसार मृत्यूच्या काही तास आधी ओम पुरी यांचा नंदिता यांच्याशी वाद झाला होता.
 
क्लिनीकल अॅनालायझर व हिस्टोपॅथिकल रिपोर्ट नंतरच गुढ उकलणार : ओम पुरी यांचा मृत्यु नैसर्गिक की अनैसर्गिक याचे उत्तर क्लिनिकल अॅनालायझर आणि हिस्टोपॅथिकल रिपोर्ट आल्यानंतरच मिळेल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या प्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.
 
पुरी यांच्या मृत्युबाबत उलटसुलट शक्यता व्यक्त होऊ लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा पोस्ट मॅार्टम रिपोर्ट क्लिनिकल अॅनेलायझर आणि हिस्टोपॅथिकल रिपोर्टसाठी अनुक्रमे जेजे रुग्णालय आणि मुंबई न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. याबद्दल बोलताना ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष खानविलकर म्हणाले की, हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल. यासाठी कमीत कमी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...