मुंबई- मागील 24 तासांत तीन हत्याकांडाने मुंबई हादरली आहे. भांडुप, मानखुर्द आणि धारावीत निर्घृण हत्येच्या घटना घडल्या आहेत. घरभाडे थकविल्याच्या रागात एकाने सख्ख्या भावाच्या छातीत कैची भोसकली आहे, दुसर्या घटनेत जन्मदात्या आईनेच दारुड्या मुलाची हत्या केली तर तिसर्या घटनेत र्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आली.
धारावीत छातीत कैची भोसकून थोरल्या भावाची हत्या
धारावीतील चमडा बाजार परिसरात राहाणारे हैदर कामरुद्दिन आलम (वय-38) यांच्या छातीत धाकट्या भावाने कैची भोसकून निर्घृण हत्या केली. अन्सार (वय-28) असे आरोपीचे नाव आहे. घरभाडे थकविल्याच्या रागातून हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... जन्मदात्या आईनेच घेतला मुलाचा जीव... काय आहे कारण?