आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आणखी तीन विशेष न्यायालये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सीबीआयने दाखल केलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यात आणखी तीन विशेष न्यायालयांची स्थापना येणार आहे. यातील एक मुंबई व दोन नागपूर येथे असतील. त्यासाठी विधी व न्याय विभागाने पदनिर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन महिन्यांत 15 पदांची निर्मिती करून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

सीबीआयने दाखल केलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी देशात एकूण 22 विशेष न्यायालये स्थापन करून आठ आठवड्यांच्या आत कार्यान्वित करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यातील तीन न्यायालये महाराष्ट्रात स्थापन करण्याची सूचनाही केली होती.