आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Std I Boys From A Dadar School Chained, Forced To Clean Toilets

शिक्षिकेने दिली कठोर शिक्षा; चिमुरड्यांकडून स्वच्छ करून घेतले शौचालय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्गात आपापसात भांडण करणार्‍या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्ग शिक्षिकेने कठोर शिक्षा दिली आहे. चिमुरड्यांना साखळीने बांधून त्यांच्याकडून चक्क शौचालय स्वच्छ करून घेतल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. ही घटना दादर येथील एंटोनिया-दा-सिल्वा हायस्कूलमध्ये घडली आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षिका सिनड्रेला परेराविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादर येथील एंटोनिया-दा-सिल्वा हायस्कूलमधील इयत्ता तिसरीच्या वर्गात काही ‍विद्यार्थी मस्ती करत होते. ते पाहून शिक्षिका सिनड्रेला परेरांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी विद्यार्थ्यांकड़ून शाळेतील शौचालय स्वच्छ करून घेतले.

याप्रकरणी एका पीडित विद्यार्थ्याचे पालक प्रकाश गांधी यांनी सांगितले की, याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार दिली होती. परंतु व्यवस्थापनाने दोषी शिक्षिकेवर कोणतीही कारवाई करण्यात नकार दिला होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागली. गांधींनी सांगितले की, त्यांच्या पाल्याला मारहाण देखील झाली आहे. त्यांच्या पाठीवर जखमेचे व्रण आहेत. त्यांला सायन रूग्णालयात उपचार घेतले होते. तर अन्य दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी याप्रकरणी गप्प राहण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या पाल्याला शाळेतून काढून तर टाकणार नाही, अशी भीती या पालकांना होती.

शिवाजी पार्क पोलिसांनी सांगितले की, आधी पी‍डित सहा विद्यार्थ्यांसह शाळेतील अन्य ‍विद्यार्थ्यांची चौकशी करण्‍यात येईल. त्या आधारावर संबंधित शिक्षिकेला अटक केली जाईल.