आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना नेत्याची बेकायदा इमारत महापालिकेने पाडली एका क्षणात; समोर आला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मीरा रोड-भायंदर भागात महापालिकेने बेकायदा बांधकामावर हातोडा टाकला. यात शिवसेना नेत्याच्या बेकायदा 3 मजली इमारतीचाही समावेश आहे. नेत्याने महापालिकेच्या कारवाईत अनेकदा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेच्या बुलडोझरसमोर तो काहीच करू शकला नाही. त्याच्या डोळ्यादेखत काही सेकंदात 3 मजली इमारत खेळण्याच्या पत्त्यांप्रमाणे जमिनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

स्था‍निक लोकांनी केली होती तक्रार...
 
- सूत्रांनुसार पाडण्यात आलेली बेकायदा इमारत भायंदर (पूर्व)चे मीरागांवचे शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर यांची होती.
 - 3 मजली इमारत बेकायदा असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी केली होती. महापालिकेने चौकशी केली असता कमलेश भोईर यांची इमारत बेकायदा आढळून आली.
 - कमलेश भोईर यांनी नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यांना नोटीसकडे दुर्लक्ष केले. नंतर महापालिकेच्या अतिक्रमन विभागाने इमारत जमिनदोस्त केली.
 - महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा शिवसेना नेत्याने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्याला यश आले नाही.
 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... महापालिकेने असा फिरवला शिवसेना नेत्याच्या बेकायदा इमारतीवर बुलडोझर...

बातम्या आणखी आहेत...