आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरायला गेलेल्या दहावीतील तीन शाळकरी मुलांचा उरणजवळ पाण्यात बुडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रायगड जिल्ह्यातील उरण गाव येथे रानसाई धरणाच्या ओढ्यात वाहून गेल्याने तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. सेल्फी फोटो काढण्याच्या एक मुलगा पाण्यात पडला व त्याला वाचविण्यासाठी इतर दोघांनी उडी मारली. त्यात तिघांचाही दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे.
शैलेश कडाले, संकेत आणि मंगेश अशी या मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. हे तिघेही नवी मुंबई परिसरात राहतात. तेथून जवळच असलेल्या उरणमधील रानसई धरण परिसरात ती फिरायला गेली होती. या तीनही मुलांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज आली नाही. त्यामुळे तो बुडू लागला. ही बाब मंगेश आणि संकेत यांच्या लक्षात येताच त्यांनी शैलेशला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी खोल असल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
या तिघांचा बु़डून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती मृत मुलांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.