आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैतापूर प्रकल्पाला धाेक्याची अावई तज्ज्ञ म्हणतात, काहीच भीती नाही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नेपाळमधील महाप्रलयंकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपप्रवण रेषेवर उभ्या केल्या जाणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकल्प काेकणातील ज्या माडबनच्या पठारावर उभारला जाणार आहे तो भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येत असून ही जागा अणुभट्टीसाठी धाेकादायक असल्याचे केंद्रीय अहवाल सांगताे. मात्र, महाराष्ट्रात नेपाळएवढ्या तीव्रतेचा भूकंप हाेण्याची सूतराम शक्यता नाही. तसेच जैतापूर परिसर भूकंपप्रवण क्षेत्राच्या विभाग तीनमध्ये येत असल्याने कमी तीव्रतेचा धरणीकंप झाला तरी त्यावर परिणाम हाेत नसल्याचा दावा भूकंपशास्त्राचे तज्ज्ञ करतात.

जैतापूरला १० हजार मेगावॅटच्या अणुभट्ट्या जेथे उभारल्या जाणार आहेत त्या माडबनच्या पठाराखालून भूभ्रंश (भूकवचातील भेग, तडा, फट) रेषा गेली आहे. प्रकल्पाच्या स्थळापासून ५ कि.मी.अंतराच्या आत आणखी दोन भूभ्रंश तर आहेतच, पण १०, १५, २४ व २५ कि.मी. अंतरावरूनही भूभ्रंश जात आहेत, असा अहवाल केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या चतुर्वेदी समितीने २००२ मध्ये दिला हाेता. मात्र, या प्रकल्पात भूकंपविरोधी यंत्रणा त्यात बसवली असल्याने अणुभट्टीला काहीही धाेका हाेणार नाही, असा दावा हा प्रकल्प उभारणा-या अरेवा कंपनीने केल्यानंतर याप्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समाेर अाली अाहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील माडबन पठाराच्या परिसरात अनेक वर्षांपासून भूगर्भीय रेषा, भूभ्रंश म्हणजे भूकवचातील गेलेल्या भेगा, तडा िकंवा फट आहेत. हे भूभ्रंश साधारणपणे ५० ते १०० किलाेमीटर लांबीचे तर काही त्याहूनही जास्त लांब आहेत. सदर भूभ्रंशाची दिशा पश्चिम
किना-याच्या दिशेने सरकते. त्याचबरोबर कोयना, लातूर, चिपळूण, राजापूर अाणि िवजयदुर्ग अशी उपभूभ्रंशाची मालिका तयार झाली आहे.
तसेच माडबनचे पठार हे जांभा दगडाने बनल्याने त्यावर अणुभट्ट्या उभारणे शक्य नसल्याने तो ब-याच प्रमाणात तोडावा लागणार आहे. काळा कठीण बेसाॅल्ट खडक लागेपर्यंत हे तोडकाम करावे लागेल व तसे झाल्यास तो समुद्र सपाटीच्या जवळ येऊ शकतो. याचा अर्थ त्सुनामी लाटेपासून अणुऊर्जा प्रकल्पाचे रक्षण करणे कठीण हाेईल, अशी भीती चतुर्वेदी यांच्या अहवालात नमूद करण्यात अाली अाहे.

जपानमधील सात अणुभट्ट्या बंद
जपानमधील काशीवाझाकी येथे ६ वर्षांपूर्वी भूकंपाच्या धक्क्याने पायाला तडे गेल्याने अणुभट्ट्यांच्या बंद करण्यात आल्या. फुकुशिमा दुर्घटनेत भूकंपामुळेच उसळलेल्या लाटेचा तडाखा बसला अाणि अणुऊर्जा प्रकल्याचे शीतकरण बंद पडून तापमान वाढत गेले व दोन दिवसांनी भट्टीतील इंधन वितळल्याने स्फोट झाला. याच भूकंपामुळे भट्टीच्या पायाला तडे गेले होते, हे वास्तव तर जगाने अनुभवले होते.

राजापूरची गंगा भूकंपप्रवणाची खूण!
पश्चिम घाटाच्या पायथ्याशी या भूभ्रंशावर असलेली उष्ण पाण्याच्या झ-यांची मालिका तयार झाली आहे. राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ही याचाच भाग आहे. ही गंगा म्हणजे दोन एक वर्षांनी भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे वाहणे सुरू हाेते. तेे झरे काही दिवस, काही महिने सुरू राहतात अाणि जसे उगवले तसेच ते लुप्त होतात. भूकंपाच्या या खुणा असून कोयना धरण परिसरातील सौम्य भूकंपाचे धक्के हे त्याचेच एक लक्षण असल्याचे मत जगप्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ डाॅ. एन.के. प्रभू यांनी व्यक्त केले आहे.

अणुभट्ट्यांमध्ये भूकंपविरोधी यंत्रणा
भूकंपाचा कितीही मोठा धक्का बसला तरी अणुऊर्जा प्रकल्पामध्ये भूकंपविरोधी यंत्रणा बसवली असल्याने अणुभट्ट्यांना काहीही होणार नाही, असा दावा हा प्रकल्प उभारणा-या अरेवा कंपनीने याआधीच केला आहे अाणि त्याला एनपीसीआयएलच्या (न्यूक्लिअर प्रोजेक्टर काॅर्पोरेश इंिडया लि.) अधिका-यांनी दुजोरा दिला आहे.

जैतापूर प्रकल्पाला धोका संभवत नाहीच
जैतापूर प्रकल्प हा भूकंपप्रवण क्षेत्राच्या विभाग ३ मध्ये येतो.विभाग ३ मधील भूकंपाचा फार काही परिणाम होत नसताे. त्यामुळे जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला काहीच धोका संभवत नाही. शिवाय अणुभट्टी उभारताना त्यात भूकंपविरोधी यंत्रणा बसवली असल्याने भूकंपाचे अतिशय सूक्ष्म धक्के बसायला सुरुवात झाली तरी अणुभट्टी ताबडतोब बंद होईल.
सिंघा राॅय, प्रकल्प संचालक, भारतीय अणुऊर्जा मंडळ

ना भूकंपाची, ना त्सुनामीची भीती
प्रस्तावित अणुऊर्जा केंद्र होणारे जैतापूर गाव कोकण किना-यावर आहे. कोकणात तीव्र भूकंपाची शक्यता नाहीच. मात्र जैतापूरपासून ९० किलोमीटर दूर असलेल्या कोयनेत जरी पुन्हा ६.५ शक्तीचा भूकंप झाला तरी त्याचा परिणाम जैतापूरवर होणार नाही, महाराष्ट्रात त्सुनामी येण्याची शक्यताही नाही.
डाॅ. अरुण बापट, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूकंपशास्त्रज्ञ

लांज्यात शिवणे गावाचे दोन तुकडे : जैतापूरपासून जवळच असलेल्या शिवणे गावाला सात वर्षांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. या छोट्याशा धक्क्यामुळेही शिवणे गावाचे दोन तुकडे झाले. जमीन खचल्यामुळे आज शिवणे गावातील एका वाडीतील लोकांना दुस-या वाडीवर
जाण्यासाठी लांबवरून जावे लागते. डाेंगरात असलेले शिवणे हे गाव शिवणे खुर्द अाणि बुद्रुक अशा दोन भागांत विभागले आहेत.