आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Caller Tune, Documentary Voting Percent Increasing By Mumbai Collector

कॉलर ट्यून, चित्रफितीतून वाढवणार टक्का, मतदार जागृतीसाठी अभिनव प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मुंबई जिल्हाधिकारी ए. शैला यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात एक मोबाइल कॉलर ट्यून आणि व्हिडिओ संदेश तयार केला आहे. मुंबईतील सर्व चित्रपटगृहांतून हा व्हिडिओ शुक्रवारपासून दाखवायला सुरुवात झाली. तसेच ऑडिओ फाइल कॉलर ट्यूनच्या रूपात मोफत देण्यात येणार आहे.
एवढेच नव्हे तर निवडणुकीची माहिती अपडेट करण्यासाठी स्वतंत्र वेबसाइटच सुरू करणारा मुंबई हा पहिला जिल्हा ठरला आहे.मुंबई जिल्हाधिकारी कायार्लयातील निवडणुकीची माहिती देताना अर्चना शंभरकर यांनी सांगितले की, तरुण मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यातून मुंबईत मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल. याकडे जिल्हाधिकारी ए. शैला यांचा भर राहणार आहे. कौटिल्य या संस्थेकडून हिंदीमध्ये जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. ‘चले चलो अधिकार जता’, ‘अपनी मुंबई को वोट देकर सरताज बनाए’, ‘वोटिंग का दिन छुट्टी का दिन नहीं है’ असे या जाहिरातीत म्हटले आहे. अनेक चित्रपटगृहांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर या जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे.

आयोगाची वेबसाइट
निवडणूक आयोगाने ‘मुंबई इलेक्शन. आर्ग ’या नावाची वेबसाइटही तयार केली असून त्यावर मतदार यादीबरोबरच निवडणुकीसंदर्भातील अनेक माहिती देण्यात आलेली आहे. हा देशातील पहिला प्रयोग असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले.