आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडवा शोभायात्रेतून दुष्काळ निधीची गुढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा. हिंदू नववर्षारंभाचा दिवस. याच मुहूर्तावर यंदा राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळासाठी मदत करण्याचा निर्णय स्वागताच्या शोभायात्रांनी घेतला आहे. सामाजिक भान राखून राज्यातून निघणा-या बहुतांश स्वागतयात्रांमध्ये सामान्यांकडून आर्थिक मदतीची विशाल गुढी उभारली जाणार आहे.
पंधरा वर्षांपूर्वी स्वागतयात्रेची पहिली मुहूर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानने यंदा फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, आतषबाजीसारख्या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराने स्वत:ची 5 लाखांची मदत जाहीर करून एकंदरीत 11 लाख रुपये जमवण्याचा संकल्प सोडला आहे. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने साधेपणाने शोभायात्रेचा, तर कल्याणमधील सांस्कृतिक मंचने खर्चकपातीचा नियम केला आहे. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अहमदनगर, गिरगावातही पाडव्याला निधी संकलन केले जाणार आहे.
औरंगाबादेत चारा व्यवस्था
औरंगाबादेत गारखेड्यामध्ये मिरवणुकीचा खर्च कमी करून दुष्काळी भागात चारापाणी व्यवस्था करण्यात आली. नववर्ष स्वागतयात्रेत यंदा दुष्काळ केंद्रस्थानी ठेवून घोषणा दिल्या जातील. ढोलबाजी व अनावश्यक खर्चाला आवर घालून वाचणा-या निधीतून पैठणमधील दुष्काळी भागात यथाशक्ती आर्थिक सहकार्य केले जाईल.’’
विलासराव देशमुख, अध्यक्ष, स्वामी समर्थ उपासना केंद्र