आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thumka Cannot Be Considered A Defamatory Word Says Congress Leaders Sanjay Nirupam

गिरीराज यांच्या वक्तव्यानंतर निरूपम म्हणाले, स्मृतींना \'ठुमकेवाली\' म्हटले तर काय चुकले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांच्याविीरूद्ध काँग्रेस नेत्यांनी मुंबईत निदर्शने केली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा असे काही वक्तव्य केले ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार निरुपम यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत काही महिन्यांपूर्वी केलेल्या 'ठुमकेवाली' टिप्पणी योग्य असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी एका न्यूज चॅनेलवर चर्चा करीत असताना निरुपमने टीव्ही मालिका काम करणा-या स्मृती इराणींना 'ठुमकेवाली' म्हटले होते. यानंतर स्मृती इराणी या रागाने चालू कार्यक्रमातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर भाजपने निरूपम यांना कायदेशीर नोटिस बजावली होती. इकडे, बिहारमधील मुजफ्फरपुर येथील एका कोर्टाने गिरिराज सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुंबईत गिरीराज सिंह व मोदींविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी निरूपम म्हणाले, गिरीराज सिंह यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा विचार करता 'ठुमकेवाली' ही टिप्पणी महिला विरोधी मानायला नको आहे. निरुपम म्हणाले, ''स्मृती इराणींबाबत मी जे वक्तव्य केले होते तो त्यांच्या व्यावसायाचा भाग होता. त्या एक अभिनेत्री आहेत व त्यांच्या व्यावसायावरून त्यांच्याबाबत भाष्य केल्यामुळे ते महिलाविरोधी वक्तव्य कसे असू शकते. मी ज्या पद्धतीने बोललो होतो त्यावरून मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही. 'ठुमक-ठुमक राम चले' हे एक भजन आहे. याचाच आधार घेत मी इराणींना ठुमकेवाली म्हटले होते. त्यात चुकीचे ते काय?''
काय म्हटले होते गिरीराज सिंह यांनी-
गिरीराज सिंह यांनी बिहारमधील हाजीपूरमध्ये सोनिया गांधींसह राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी लग्न केले असते, गोरी कातडी नसती तर काँग्रेस पक्षाने त्यांचे (सोनिया) नेतृत्व स्वीकारले असते का? अशी मुक्ताफळे उधळली होती. राहुल गांधींच्या सुटीवरून मजाक करताना त्यांनी म्हटले होते की, ''राहुल मलेशियन विमानासारखे गायब होतात. त्यांचा काही संपर्कच होत नाही.