आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमाला चक्क तिकीट; \'साखर खाल्लेला माणूस\'साठी खर्चावे लागणार पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेने आपल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची चक्क तिकीट विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. षण्मुखानंद हॉल येथे वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांना यासाठी ३५०, २५० आणि १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
 
१९ जून रोजी शिवसेनेचा  वर्धापन दिन असून यानिमित्ताने षण्मुखानंद हॉलमध्ये नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असून युवा सेना नेते आदित्य ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दामले अभिनीत ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे. हा प्रयोग आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण शिवसैनिकांना तिकीट काढून ऐकावे लागणार आहे.यापूर्वीही वर्धापन दिनानिमित्त नाटक, संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे. परंतु कधीही त्यासाठी तिकीट लावले नव्हते. यंदा प्रथमच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री करून पैसे जमा करण्यात येणार आहेत.

..तर शिवसेना सत्‍तेची परवा करणार नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा
 
बातम्या आणखी आहेत...