आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत आहे \'टायगर\'! वाचा मुंबई स्फोटातील मास्टरमाईंड मेमनची कहाणी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायगर मेमन - Divya Marathi
टायगर मेमन
मुंबई- 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख मास्टरमाईंड टायगर मेमन अजून जिवंत आहे. तसेच आपला भाऊ याकूब मेमनला ज्या दिवशी फासावर लटकवले त्या दिवशी टायगरने मुंबईत राहणा-या आपल्या आईसोबत व कुटुंबियांसमवेत तीन मिनिटे फोनवर चर्चा केल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 वर्षानंतर प्रथमच टायगर हा जिवंत आहे असा पुरावा मुंबई पोलिसांना मिळाला आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्सने आज दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी टायगर आणि त्याच्या आईत झालेले संभाषण टेप केले आहे. मात्र, इंटरनेटवरून आलेल्या फोनमुळे हा फोन कोठून आला याचा खुलासा करण्यात अपयश आले आहे.
मुंबई बॉम्बस्फोट घडविण्यामागे टायगर मेमनचे नाव सर्वात पुढे आहे. सीबीआने दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, टायगरच्या देखरेखीखालीच स्फोटाची तयारी करण्यात आली. टायगरच्या सांगण्यावरूनच याकूबने सर्व वाहनांची व पैशाची व्यवस्था केली होती. या दोघांशिवाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा छोटा भाऊ अनीस इब्राहिम हे ही या हल्ल्याचे मास्टरमाईंड होते. आज आम्ही तुम्हाला टायगर मेमनशी संबंधित सर्व कहानी सांगणार आहोत...
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून वाचा, टायगर मेमनची संपूर्ण कहानी....