आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील वाघ वाढले, "सेव्ह द टायगर" मोहिमेला यश, वनमंत्र्यांनी दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशभरातील अभयारण्यात वाघांची संख्या घटत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत असताना महाराष्ट्रात मात्र वाघांची संख्या वाढली आहे. राज्यातील वाघांची संख्या 160 वरून 200 वर गेली आहे, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले आहे.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की वाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यातील 17 गावांचे पूर्नवसन करण्यात यश आले आहे. यासह इतही उपाययोजना केल्यामुळे महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढली आहे. जंगलातील प्रत्येक झाडाची नोंद ठेवणारे यंत्र प्रत्येक वनरक्षकाला देण्यात येणार आहे. तसेच वनक्षेत्राचे नकाशे नव्याने तयार करण्यात येत आहे. त्यामुळे वनांची अनियंत्रित कत्तल कमी करण्यास मदत होईल. याचा लाभ वनांमधील जीवांना होईल.
सांगलीतील कुंडल येथे वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अॅकॅडमी मंजुर केली जाणार आहे. ही अशा प्रकारची देशातील चौथी आणि महाराष्ट्रातील पहिली अॅकॅडमी राहिल.
कशी वाढली वाघांची संख्या वाचा पुढील स्लाईडवर