आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांची शिकार करणा-यांची होणार सीबीआय चौकशी, वनमंत्र्यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची तस्करी वाढत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी केली.
शोभा फडणवीस आणि नागो गाणार या सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित उपस्थित केला होता. चंद्रपूर वन विभागाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या बफर झोनमध्ये एप्रिल महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कदम यांनी दिली.

पकडलेल्या बिबट्यांना यापुढे जंगलात सोडले जाणार नाही. चंद्रपूर विभागात रॅपिड रिस्पॉन्स युनिट 24 तास कार्यरत असून बिनतारी संदेश कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. या परिसरात हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित आहे. तसेच कॅमेरा ट्रॅप लावून वाघ आणि बिबटे यांच्या हालचालींचे नियंत्रण करण्यात येत असल्याचे कदम म्हणाले.