मुंबई- ठाण्यातील कळवा भागातील राजीव गांधी वैदयकीय महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने 30 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनाला मेल करून माहिती दिल्यानंतर ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. महाविद्यालय प्रशासनाने संबंधित आरोपी प्राध्यापकाला निलंबित केले आहे. मात्र, त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नसून तो दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शैलेश्वर नटराजन असे या आरोपी प्राध्यपकाचे नाव आहे. मुलींनी मेलद्वारे तक्रार केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने चौकशी समिती नेमून त्याचे निलंबन केले आहे. दरम्यान, नटराजन याच्यावर गुन्हा का दाखल केला जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.