आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांना डोळ्यासमोर ठेवून यूपीएससी परीक्षेची केली तयारी - टीना डाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्रोत आिण आयडाॅल आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी यूपीएससी परीक्षेसाठी संघर्ष करत असल्यामुळे भारतात पहिली येऊ शकले. बाबासाहेबांच्या कर्मभूमीत आज होत असलेल्या सत्काराने मी भारावून गेले आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंती वर्षात भीमाच्या बेटीस घवघवीत यश प्राप्त होणे अभिमानाची गोष्ट आहे, असे हृद््गत यंदा यूपीएससीमध्ये अनुसूचित जमातीच्या पण खुल्या वर्गातून देशात टाॅपर आलेल्या टीना डाबी हिने व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभाग आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी मुंबईत टीना डाबी हिचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देातना टीना डाबी बोलत होती. मी विद्यार्थिदशेतच लाल दिव्याचे स्वप्न बघितले होते. समाजात चुकीच्या गोष्टी बदलण्याची तुमची इच्छा असेल तर स्पर्धा परीक्षेपासूनच काय, त्यातील यशापासूनही तुम्ही दूर राहू शकत नाही.

समाजासाठी काही करण्यासाठी प्रत्येकाने आयएएस व्हायला पाहिजे असे नाही. तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाजऋण फेडू शकता, असे टीना म्हणाली. या वेळी टीना हिने आईचे आभार मानले. तिची आई हेमाली डाबी या मराठी असून त्या मूळच्या नागपूरच्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले - शाहू- आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रोवली. त्याचे फलित आज आपल्याला टीना डाबी या तरुणीच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून तरुणांनी सनदी सेवेत करिअर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

सत्कार सोहळ्यास बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, दिल्लीतील पोलिस अधिकारी संदीप तामगाडगे, सनदी अधिकारी सुनील वारे आणि अधिकारी उपस्थित होते.

जिद्दी बना
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंडावर मात करून नैराश्यावर विजय मिळवण्याची कला आत्मसात करा. ही कला आत्मसात केल्यास असाध्यला साध्य करू शकाल, असा मंत्र टीना डाबी हिने उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
बातम्या आणखी आहेत...