आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमन टाळण्यासाठी खुल्या बाजारातून वीज घेणार; पॉवर एक्स्चेंजमधून कोळसा घेण्याचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे महावितरणने राज्यात भारनियमन केले खरे; परंतु त्यामुळे वीज पुरवण्यासाठी महावितरण आता छोट्या निविदांद्वारे खुल्या बाजारातून वीज घेणार असून पॉवर एक्स्चेंजमार्फतही वीज घेण्याचा प्रयत्न महावितरण करणार आहे. वीज निर्मितीसाठी कोळसा उपलब्ध व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांना विनंती केली आहे.  
 
वीज निर्मिती केंद्रांना कोळशाची उपलब्धता व पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मात्र, विजेची उपलब्धता होताच वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात येईल, असे महावितरणतर्फे शनिवारी सांगण्यात आले. राज्यात कृषिपंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेज योजना आहे, अशा वाहिन्यांवर सध्या दिवसा आठ तास व रात्री आठ तास अशा दोन टप्प्यात चक्राकार पद्धतीने रात्री दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...