आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिगाऱ्याखाली अडकली होती ही व्यक्ती, WhatsApp वर सांगितले, जीव वाचवा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीने आपल्या नातलगांना व्हॉटसअॅप मेसेज पाठवून आपण जीवंत असल्याचे सांगितले. मला वाचवा असे त्याने या संदेशात म्हटले होते. त्यानंतर नातलग लगेच घटनास्थळी गेले त्यांनी त्यांनी एनडीआरएफच्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांना हा मेसेज दाखवला. त्यानंतर बचाव पथकाने संदेश पाठविणाऱ्या रिझवी जफर आणि त्यांच्या पत्नी रेश्माचा शोध सुरु केला. त्यांना 13 व 14 वर्षाची 2 मुले आहेत. त्यांनाही ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

सरकारकडून मिळणार 5 लाखाची मदत
- घटनास्थळी पोहचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 

इमारतीत बालवाडी 
- जे. जे. हॉस्पीटलजवळ असणाऱ्या या इमा्रतीत 13 कुटुंबे राहत होती. महापालिकेने 2011 मध्ये ती धोकादायक इमारत म्हणुन जाहीर केली होती.
- या इमारतीत एक बालवाडीही चालविण्यात येत होती. बालवाडी सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर इमारत कोसळली.
- या इमारतीमधील 3 मजल्यांनाच परवानगी होती. अन्य 3 मजले अनधिकृतपणे बनविण्यात आले होते. या इमारतीत काही दुरुस्तीची कामे सुरु होती.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...