आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Set Up SIT For The Adivasi Scheme Corruption High Court

आदिवासी विकास योजनांमधील भ्रष्टाचार चौकशीसाठी एसआयटी नेमा- उच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदिवासी विकास योजनांमधील कथित सहा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका नाशिक येथील बहिराम मोतीराम यांनी दाखल केली आहे.


आदिवासींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना लिक्विड प्रोटीन व गाई-म्हशींचे वाटप करण्याची आदिवासी विकास विभागाने योजना आखली होती. तसेच, पाणी उपशासाठी इंजिन्स आणि पाइप पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु या योजनांच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या निधीचा लाभ आदिवासींना मिळालाच नाही. ते संबंधित भ्रष्टाचा-यांच्याच खिशात गेले. तसेच, संबंधित वस्तू निविदाप्रक्रियेचा अवलंब न करताच घेण्यात आल्या, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.