आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव व आदित्य ठाकरे यांचा आज ‘राज्याभिषेक’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेत आजवर अध्यक्षपद नव्हते, परंतु बुधवारी होणा-या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपद तयार करण्यात येणार असून विद्यमान कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे. तसेच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची कार्यकारी प्रमुख म्हणून निवड केली जाईल अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

शिवसेनाप्रमुख पद फक्त बाळासाहेबांसाठीच होते. अन्य कोणी या पदनामाचा वापर करणार नाही असे उद्धव यांनी स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यकारिणी तयार करण्यात येणार असून, निकषांनुसार पक्षप्रमुखांचे नाव ठरवावे लागते. त्यामुळे पक्षप्रमुख किंवा अध्यक्षाचे (पार्टी प्रेसिंडेंट) नाव घोषित करणे बंधनकारक आहे. पक्षाचे सर्वाधिकार बाळासाहेबांकडेच होते व तशी नोंदही आयोगाकडे होती.
मात्र आता कायद्याच्या चौकटीत कार्यकारिणीची रचना करताना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून काय पद स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. इतर पक्षांप्रमाणे कार्यकारिणी
नसली तरी नेते, उपनेते, सचिव आणि प्रवक्ते ही पदे निर्माण करण्यात
येतील आणि ती आयोगाला कळवण्यात येतील.

आदित्य ठाकरे कार्यकारी प्रमुख!

आदित्य यांच्याकडे कार्यकारी प्रमुखपदाची जबाबदारी द्यावी अशी काही शिवसेना नेत्यांची मागणी असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे या पदावर आदित्य यांची निवड होण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास त्यांना शिवसेना नेतेपद तरी दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.