आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today MESMA Imposing On Professors ; Chief Minister Prithiviraj Chavan

प्राध्यापकांवर आज मेस्मा लावणार - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन महिन्यांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांवर मेस्मा लावण्याच्या पत्रावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सही केली आहे. शुक्रवारी संप मागे घेतला नाही, तर मेस्मांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. सरकारने प्राध्यापकांचे 1500 कोटी देण्याचा निर्णयही घेतला आहे. नेट-सेट अनुत्तीर्ण प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यासाठी संप सुरूच ठेवला आहे. दरम्यान, एलबीटी मागे घेणार नाही, असे स्पष्ट करतानाच व्यापा-यांविरोधातही कठोर पावले उचलण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


काय आहे मेस्मा?
० मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा.
० अत्यावश्यक सेवांवर परिणाम करणा-यांवर कारवाई करता येते.
० मेस्माच्या यादीत शिक्षण क्षेत्र येत नाही, परंतु सरकार कोणतेही क्षेत्र त्यात समाविष्ट करू शकते.


पुढे काय
० पोलिस संपक-यांना विनावॉरंट अटक करू शकतात
० संपक-यांना एक वर्ष तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.
० जामिनासाठी प्राध्यापकांना न्यायालयातच जावे लागणार आहे.