आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Nation Celebrate 58 Th Mahaparinirvan Of Dr.babasaheb Ambedkar

चैत्यभूमीवर आज मानवंदना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यघटनेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. शनिवारी या महामानवास शासकीय मानवंदना दिली जाणार आहे. काही संघटनांच्या इशा-यामुळे महापरिनिर्वाण दिनावर इंदु मिल आंदोलनाचे सावट पसरले आहे.

चैत्यभूमीलगत असणा-या शिवाजी पार्क मैदानावर भीमसैनिकांच्या निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पालिकेने केलेल्या नागरी सुविधांचे शुक्रवारी महापौर स्नेहल आंबेकर यांनी उद‌्घाटन केले. शिक्षण मंत्री विनोद तावडे व सामाजिक न्यायमंत्री दिदलीप कांबळे यांनी शुक्रवारी चैत्यभूमीला भेट देऊन प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला.शनिवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करतील. संपूर्ण चैत्यभूमीवर परिसरावर या वेळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी पहिल्यांदाच शासकीय मानवंदनाही देण्यात येणार आहे.

महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर देश-विदेशातून लाखो लोक येतात. त्यामुळे दादर परिसराला जनसागराचे स्वरूप येत असते. चार दिवसांपासून भीमसैनिक दादरमध्ये डेरेदाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन, उपनगरी रेल्वे आणि बेस्ट प्रशासन यांनी विशेष गाड्यांची सोय केलेली आहे.