आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने झिडकारताच भाजपची 175% वाढ, मुंबई महापालिकेत सत्तेसाठी अटीतटी, ठाण्यात शिवसेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाेकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांपाठाेपाठ जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांतही भरघाेस यश मिळवून राज्यात खऱ्या अर्थाने नंबर वन पक्षाचा लाैकिक मिळवण्यात भाजपला यश अाले अाहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व ‘पारदर्शक कारभारा’च्या अावाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी भाजपच्या झाेळीत भरभरून मतांचे दान टाकले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही मिनी मंत्रालयाच्या सत्तास्थानापर्यंत हा पक्ष पाेहाेचला
 
. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीत प्रथमच स्वबळावर शिवसेनेच्या बराेबरीने भाजपला यश मिळाले. ८४ जागा घेऊन शिवसेना माेठा पक्ष ठरला, तर ८२ जागा पटकावलेल्या भाजपनेही प्रथमच देशाच्या अार्थिक राजधानीत महापाैर बसवण्यासाठी दावेदारी सिद्ध केली अाहे.
 
एकेकाळच्या या मित्रपक्षांतील भांडणात काँग्रेस- राष्ट्रवादी पक्ष मात्र अक्षरश: ‘रसातळा’ला गेले.
अाठ पालिकांत भाजप गेल्या २५ वर्षांपासून युतीत असलेल्या शिवसेनेशी युती तुटल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज प्रचार केला.
 
‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन फडणवीसांनी चांदा ते बांदा सभा घेतल्या. त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या स्वप्नांनाही मतदारांनी भरभरून साद दिली. पुणे, पिंपरी- चिंचवड, साेलापूर, उल्हासनगर, नागपूर, अमरावती, अकाेला, नाशिक या अाठही महापालिकांवर भाजपने वर्चस्व मिळवले अाहे.
 
मुंबईकरांनी शिवसेना-भाजपला समान संधी दिली. शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. महापाैर अापलाच हाेणार असा दावा दोघांनी केला अाहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील व सुधीर मुनंगटीवार यांनी युतीसाठी भाजप सकारात्मक असल्याचे संकेत दिले अाहेत. 
 
ठाण्याचा गड शिवसेनेने राखला; 60 जागांवर विजय
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होत असताना ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात शिवसेनेने यश मिळवले आहे. ठाण्यात १३१ जागांपैकी शिवसेनेने ६० जागा जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.   

३१ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जितेंद्र आव्हाड, वसंत डावखरे आणि गणेश नाईक असे दिग्ग्ज नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे नेतृत्व करतात. भाजपला ठाण्यामध्ये २१ आणि काँग्रेसला केवळ तीन जागांवर  समाधान मानावे लागले आहे. ठाण्याच्या राजकारणामध्ये एमआयएम पक्षाने एंट्री केली असून मुंब्रा येथून शेख हजारा आणि आझमी शाहीद हे एमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचा पुतण्या मंदार विचारे याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे, तर विचारेंची पत्नी नंदिनी विचारे यांचा मात्र विजय झाला आहे.  
 
उल्हासनगरमध्ये ‘कमळ’ फुलले; भाजपला ३२; शिवसेनेला २५ जागा     
मुंबई- उल्हासनगर महापालिकेच्या एकूण  ७८ जागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपने ७८ पैकी ३२ जागांवर यश संपादन केले आहे, तर शिवसेनेला २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतर महापालिकांप्रमाणेच भाजपने उल्हासनगरमध्येही सत्ता आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले हाेते.    
 
अाेमी कलानींमुळे चर्चेत अालेल्या उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, भाजपने पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याला पक्षात प्रवेश दिला आणि कलानी कुटुंबाच्या साथीने भाजपने उल्हासनगरची सत्ता मिळवण्यात यश मिळवले. एकूण ७८ जागांपैकी भाजप ३२, शिवसेना २५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, रिपाइं २, भारिप १, पीआरपी १, साई ११, काँग्रेस १ आणि इतर १ असे उल्हासनगरमध्ये पक्षीय बलाबल आहे. 
बातम्या आणखी आहेत...